
भारत व इंग्लंड यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केवळ ७५ षटकांचा खेळ होऊ शकल्यामुळे इंग्लंडचे माजी कर्णधार व सध्या समालोचक असलेले मायकेल वॉन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दिवसभरात ९० षटकांची गोलंदाजी अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे.