England vs India, 3rd Test at Lord's, London: लोकेश राहुलच्या शतकाने आणि रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांनी भारताला फ्रंटसीटवर बसवले होते. पण, लंच ब्रेकपूर्वी व नंतर रिषभ अन् लोकेश माघारी परतले अन् पडझड सुरू झाली. रवींद्रने ७२ धावांची खेळी करून भारताला आघाडीच्या दिशेने नेले होते. पण, ३७६ धावांवर त्याची विकेट पडली अन् त्यानंतर ३८७ धावांवर संपूर्ण संघ माघारी परतला. त्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३८७ धावांची बरोबरी ते करू शकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दोन डावांत बरोबरी होण्याची ही ९वी वेळ आहे आणि ज्या संघाने लक्ष्याचा पाठलाग केला, तो फक्त एकवेळा जिंकला आहे.