Anvay Dravid Scores hundred : भारताचा माजी खेळाडू व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा लहान मुलगा अन्वय यानेही क्रिकेटचे मैदान गाजवण्यास सुरुवात केली आहे. अन्वनये विजय मर्चंट ट्रॉफीत कर्नाटक संघासाठी नाबाद शतकी खेळी केली. . Vijay Merchant Trophy मुलापडू येथील मैदानावर सुरू असलेल्या लढतीत झारखंडच्या १६ वर्षांखालील संघाविरुद्ध अन्वयने ही शतकी खेळी केली.त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने सामना अनिर्णीत राखून महत्त्वाचे ३ गुण खात्यात जमा केले आहेत..IND vs AUS Gabba Test Playing XI: ऑस्ट्रेलियाचं ठरलंय...! आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार दोन बदल; वाचा कोणाचा पत्ता होतोय कट.झारखंडचा पहिला डाव ३८७ धावांवर गुंडाळला गेला. त्यांच्याकडून तौहिद ( ९८), तन्मय ( ६०), कर्णधार साकेत कुमार सिंग ( ५८) व मनमीत सागर ( ७२) यांनी दमदार खेळ केला. त्यांना स्वरित सिंग (३१) व सिद्धार्थ सिन्हा ( २४) यांची साथ मिळाली. कर्नाटककडून सुकूर्थ जे याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर अयान एस के व अथर्व देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. .तौहिद व तन्मय यांनी ३४१ चेंडूंत १६३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिद्धार्थ व स्वरित यांनी ५० धावा जोडल्या. मनमीत सागर व साकेत यांच्या १११ धावांच्या भागीदारीने झारखंडला मजबूत स्थितीत आणले. प्रत्यु्त्तरात कर्नाटकला आर्या गोवडा व ध्रुव कृष्णन यांनी २२९ धावांची दमदार सलामी मिळवून दिली. .Ajinkya Rahane : च्या वादळी ९८ धावा ! SAMT 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज; मुंबई फायनलमध्ये, हार्दिकचा संघ बेकार हरला.आर्याने २४६ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या, तर ध्रुवने १९० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १२२ धावांची खेळी केली. श्यामंतक अनिरुद्ध (७६) व अन्वयने नाबाद शतक पूर्ण केले. त्याने १५३ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह १०० धावा करताना संघाला ४ बाद ४४१ धावांपर्यंत पोहोचवले. कर्नाटकने पहिल्या डावातील आघाडीमुळे ३ गुण खिशात घातले. .विजय मर्चंट ट्रॉफीच्या मागली सामन्यात अन्वयने दोन डावांत ७५ धावा केल्या होत्या आणि त्यात अर्धशतकाचा समावेश होता. याआधी त्याने १४ वर्षांखालील स्पर्धेत मागच्या वर्षी कर्नाटक संघाचे कर्णधारपद भूषविले होते. २०२० मध्ये त्याने BTR शिल्ड १४ वर्षांखालील गटाच्या सामन्यात ९० धावांची खेळी केली होती. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.