BCCI mourns death of veteran cricketer Dilip Doshi : भारतीय संघ लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळतोय. भारतीय संघाच्या ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर बिनबाद २० धावा केल्या आहेत. भारताला ही कसोटी जिंकण्याची संधी आहे, परंतु सोमवारी भारतीय क्रिकेटला धक्का देणारी बातमी समोर आली. भारतीय क्रिकेट संघाने माजी डावखुरा फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.