धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Former India cricketer Rajesh Chauhan FIR: भारतीय क्रिकेटमधील माजी फिरकीपटू विरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
Rajesh Chauhan fraud case explained

Rajesh Chauhan fraud case explained

esakal

Updated on

Rajesh Chauhan transport contract cheating case explained : भारताचा माजी फिरकीपटू राजेश चौहान याच्याविरोधात FIR दाखल करण्यात आले आहे. एका स्टील कंपनीसोबत वाहतुकीचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १५ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2) अंतर्गत शुक्रवारी मोहन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिस अधिकारी केशव कोसळे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com