

मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. मुंबई क्रिकेट संघटनेत त्यांनी निवड समिती सदस्य, मार्गदर्शकासह अनेक भूमिका पार पाडल्या होत्या. वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या सोहळ्यात MCA कडून या स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात ते मुंबई संघाचे सदस्य होते. मुंबई क्रिकेट वर्तुळात त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.