Shahid Afridi vs Wasim Akram Pakistan Team Selection
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याने महान वेगवान गोलंदाज वासीम अक्रम याच्यावर टीका केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर अक्रमने पाकिस्तानच्या संघातून अनेक खेळाडूंना वगळण्याची गरज असल्याचे मत मांडले होते, त्यावर आफ्रिदीने जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानला न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बांगलादेशविरुद्धचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही.