Yograj Singh Slams Pakistan Cricketers; Wasim Akram Fires Back
भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर सर्वच टीका करत असताना योगराज यांनी या संघाला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती. त्याचवेळी त्यांनी समालोचन करताना संघावर टीका करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचे कान टोचले. हे सर्व पैशांसाठी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आता त्यावर पाकिस्तानचा महान माजी वेगवान गोलंदाज वासीम अक्रमने प्रशिक्षक पदावरून माजी खेळाडूंवर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.