MS Dhoni | CSK | IPL
MS Dhoni | CSK | IPLSakal

''MS Dhoni स्वतःला नियमांपेक्षाही मोठा समजतो, त्याच्यात खिलाडूवृत्तीचा अभाव!'' कुणी केले गंभीर आरोप

Daryl Harper accuses MS Dhoni of time wasting: आयपीएल २०२३ मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असताना झालेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे दिग्गज क्रिकेट अंपायर हार्पर यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
Published on

Former umpire criticizes MS Dhoni: भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी हा लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. पण असं असलं तरी त्याच्याबाबतीत काही मोजके वादही झाले आहेत. साल २०२३ मध्येही असाच एक वाद झाला होता. आता त्याबाबतच बोलताना अंपायर डॅरिल हार्पर यांनी धोनीवर निशाणा साधला आहे.

काय घडलेली घटना?

साल २०२३ आयपीएलमध्ये पहिल्या क्वालिफायर १ सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात सामना झाला होता. त्यावेळी धोनी चेन्नईचा कर्णधार होता. चेन्नईने गुजरातसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यावेळी गुजरात धावांचा पाठलाग करत असताना धोनीला १६ व्या षटकात वेगवान गोलंदाज मथिशा पिथिरानाला गोलंदाजी द्यायची होती.

मात्र १६ व्या षटकापूर्वी पाथिराना ९ मिनिटांसाठी मैदानातून बाहेर होता. त्यामुळे नियमानुसार त्याने मैदानातील वेळ पूर्ण केला नसल्याने तो १६ वे षटक लगेचच टाकू शकत नव्हता. त्याला गोलंदाजीपूर्वी त्याचा ९ मिनिटांचा वेळ आधी भरून काढावा लागणार होता.

MS Dhoni | CSK | IPL
विराट कोहलीने खेळाडू म्हणून भरला सर्वाधिक टॅक्स! MS Dhoni ही टॉप लिस्टमध्ये, पण रोहित शर्माचे नावच नाही
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com