
esakal
पश्चिम आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू. आणि आज या शहराच्या वेगवान रस्त्यांवर रविवारी झालेल्या अझरबैजान ग्रां प्रि स्पर्धेत रेड बुलचा मॅक्स व्हरस्टॅपनने पूर्ण वर्चस्व गाजवले. तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडीवर राहिला आणि ५१ फेऱ्यांनंतर १४ सेकंदांच्या फरकाने मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलला मागे टाकून विजय मिळवला. विल्यम्सच्या कार्लोस साईनझने तिसऱ्या स्थानावर येऊन पहिल्यांदाच पोडियम साजरा केला, तर मॅक्लारेचा चॅम्पियनशिप लीडर ऑस्कर पिआस्ट्रि पहिल्याच फेरीत धडकून बाहेर पडला..