Devdutt Padikkal smashed his fourth List A century in just five innings
esakal
Why Devdutt Padikkal not selected for India ODI squad vs NZ? देवदत्त पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आणखी एक शतक झळकावले. मागील पाच सामन्यांतील हे त्याचे लिस्ट ए क्रिकेटमधील चौथे शतक ठरले. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तने आज त्रिपुराविरुद्ध १०८ धावांची खेळी केली. त्याच्या शतकाच्या आणि स्मरण ( ६०) व अभिनव मनोहर ( नाबाद ७९) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कर्नाटकने ७ बाद ३३२ धावांचा डोंगर उभा केला. मागच्या वर्षी करुण नायरने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा गाजवली होती आणि आता देवदत्त दमदार कामगिरी करून टीम इंडियाचे दार ठोठावतोय. पण, त्याला वन डे संघात स्थान मिळणे अवघड आहे.