Italy qualifies for ICC Men’s T20 World Cup 2026 – full story फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील मोठं नाव असलेल्या इटली या देशाने आता क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही पदार्पण केले आहे. इटलीच्या फुटबॉल संघाने १९३४, १९३८, १९८२ व २००६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. आता इटलीचा क्रिकेट संघ पुढच्या वर्षी भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार आहे. ICC Men's T20 World Cup Europe Qualifier स्पर्धेतून इटली व नेदरलँड्स या संघांनी वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली. जर्सी या देशाची संधी यावेळेस मात्र हुकली.