विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याला कसोटी खेळण्यात आता रस नाही हे स्पष्ट केले आहे. रोहित शर्माच्या अचानक निवृत्तीनंतर विराटच्या या निर्णयाने BCCI ला एकप्रकारे धक्काच बसला आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. रोहितच्या निर्णयानंतर शुभमन गिलकडे कसोटी संघाचे कर्णधारपद जाण्याची शक्यता बळावली आहे. या दौऱ्यासाठीचा संघ पुढील आठवड्यात जाहीर होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, विराटने त्याचा निर्णय न बदलल्यास या संघात जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा ( निवड झाल्यास) हे दोनच अनुभवी खेळाडू असतील.