Rohit Sharma ensures a little girl’s safety at Mumbai Airport as a viral video
esakal
Rohit Sharma’s Human Side Wins Hearts Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या ( IND vs NZ) वन डे मालिकेसाठी मुंबईहून वडोदाराच्या दिशेने रवाना झाला आहे. मुंबई विमानतळावर रोहित पोहोचला, तेव्हा त्याचा फोटो काढण्यासाठी माधम्यांसह चाहत्यांची गर्दी होती. या गर्दीमध्ये त्याचे लक्ष एका चिमुकलीकडे गेले आणि तिच्या सुरक्षिततेसाठी रोहित आटापीटा करताना दिसता. एवढ्या गर्दीत चिमुकलीला असेच सोडून जाणाऱ्या पालकांना त्याने फैलावर घेतले. "असं मुलांना मध्येच आणू नका, काय करताय तुम्ही, चुकीचं करताय यार.." असे रोहित Video मध्ये बोलताना दिसला.