

Gary Sobers
esakal
सकाळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील मैदानावर एकेकाळी सर गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, सर कॉनरॅड हंट, लान्स गिब्ज अन वेस्ली हॉलसारखे वेस्ट इंडीजचे धुरंधर क्रिकेटपटू खेळल्याचे क्वचितच नागपूरकरांना माहिती असेल.
६८ वर्षांपूर्वी झालेल्या त्या ऐतिहासिक सामन्यात सोबर्स व हंट यांनी षट्कार-चौकारांची तुफान आतषबाजी करून विद्यापीठाचे मैदान अक्षरशः दणाणून सोडले होते.