
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या पाचव्या सामन्याआधी गौतम गंभीर आणि ओव्हलचे पीच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला होता.
फोर्टिस यांनी खेळपट्टीपासून दूर राहण्यास सांगितल्यामुळे हा वाद झाल्याचे समोर आले.
दरम्यान, या वादानंतर पुन्हा गौतम गंभीर आणि फोर्टिस समोरासमोर आले होते, त्याचाही व्हिडिओ समोर आला आहे.