Virat Kohli reaction to Gambhir hai hai chants
esakal
Gautam Gambhir trolled by fans after India loss: भारतीय संघाला तिसऱ्या वन डे सामन्यातील पराभवामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमवावी लागली. न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिलीच वन डे मालिका ठरली. या पराभवामुळे पु्न्हा एकदा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका, या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर घरच्या मैदानावर भारताने किवींविरुद्ध वन डे मालिकाही गमावली. त्यामुळे चाहते संतापले आणि त्यांनी गौतम गंभीर हाय हाय अशी नारेबाजी केली. हे सर्व विराट कोहली ( Virat Kohli) समोर घडलं आणि त्याची रिअॅक्शन व्हायरल होत आहे.