Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मा अन् विराट कोहली असे दोन दिग्गज टीम इंडियाच्या कसोटी संघात आता दिसणार नाही. रोहितने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर विराटनेही बीसीसीआयला कसोटी खेळणार नसल्याचे कळवले होते, परंतु त्यांच्याकडून स्टार फलंदाजाला निवृत्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली गेली. पण, विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि सोमवारी त्याने इंस्टा पोस्ट लिहून अखेर निवृत्ती जाहीर केली.