

Gautam Gambhir Message Team India
esakal
Gautam Gambhir Message Team India: भारत आणि श्रीलंका(IND VS SL) यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे. पहिला सामना गॉल येथे खेळवला जाणार आहे.
या मालिकेपूर्वी भारतीय संघाने कोलंबोमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान भारतीय संघ तीन दिवसांचा सराव सामना खेळणार असून, त्यानंतर संघ गॉलकडे रवाना होईल. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळाडूंना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.