Gautam Gambhir Rohit Sharma Retirement Champions Trophy 2025
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले आहे. रोहितच्या भविष्याबद्दल गौतमने व्यक्त केलेल्या मताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३७ वर्षीय रोहितने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि आता तो वन डे फॉरमॅटलाही रामराम करेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण, भारताला २०२७ मध्ये वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि तोपर्यंत रोहित ३९ वर्षांचा होईल. त्यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित निवृत्ती घेईल, अशी शक्यता आहे.