Gautam Gambhir on Rohit Sharma and Virat Kohli ODI World Cup 2027
esakal
Gautam Gambhir statement about World Cup 2027 preparations : भारतीय संघाने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-० अशी खिशात घातली. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत रोहित शर्मा व विराट कोहली ( Rohit Shamra & Virat Kohli) यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. कारण या मालिकेतील कामगिरीवर रोहित व विराटच्या भविष्याचा निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यात आज मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या विधानाने चाहत्यांची चिंता वाढली आहे.