Why did Gautam Gambhir return from England before Test series? भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वीच्या शेवटच्या सरावाला आजपासून सुरुवात होतेय. भारत विरुद्ध भारत अ अशा संघांमध्ये आजपासून सराव सामना सुरू होतोय आणि त्यातून इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार, हे ठरेल. पण, या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला तातडीने मायदेशार परतावे लागले आहे. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी हे कोणतं संकट ओढावलं आहे? असा प्रश्न पडू लागला आहे.