भारत-इंग्लंड चौथी कसोटी मँचेस्टरमध्ये रोमांचक शेवटासह ड्रॉ राहिली.
बेन स्टोक्सने रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदरला खेळ थांबवून सामना ड्रॉ करण्याची विनंती केली.
जडेजा आणि सुंदर दोघांनी नकार देत दमदार खेळ करत आपली शतके पूर्ण केली.
Gautam Gambhir criticizes Ben Stokes handshake row : भारत-इंग्लंड चौथी कसोटी ड्रॉ राहिली, परंतु पाचव्या दिवशी मँचेस्टरमध्ये जे घडलं त्याची चर्चा आता होणारच.. दिवसाचा खेळ संपायला तासभर शिल्लक असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांच्याजवळ गेला अन् त्यांना खेळ थांबला सामना ड्रॉ करा अशी विनंती केली. जड्डू व सुंदर तेव्हा दोघंही ९०च्या आसपास खेळत होते, भारतीय फलंदाजांनी नकार दिला अन् इंग्लिश खेळाडू संतापले. सामन्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्टोक्सचा चांगलाच समाचार घेतला.