इंडियन प्रीमिअर लीग २०२५ नंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा येत्या काही दिवसांत होणे अपेक्षित आहे आणि निवड समितीसोबतच्या चर्चेसाठी गंभीर मुंबईत आला आहे. यावेळी त्याने पत्नीसह दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांसमोर नतमस्तक झाला.