RCB Parade Tragedy Sparks Debate : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअऱ लीगच्या १८व्या पर्वात पहिले जेतेपद पटकावता आले. १७ वर्षानंतर मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन जंगी करण्याची RCB ने तयारी केली होती. कर्नाटक सरकारही यात सहभागी झाले आणि खेळाडूंना घेण्यसाठी चक्क उप मुख्यमंत्री विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विधान सौदा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला. पण, त्याचवेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि ११ लोकांना जीव गमवावा लागला, तर पन्नासहून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर RCB आणि विराट कोहली यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आता भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचे जुने विधान चर्चेत आले आहे.