
मँचेस्टर : भारतीय क्रिकेट संघाचे महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या निवडीवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड ही कर्णधाराच्या सल्ल्यानुसार करायला हवी. मुख्य प्रशिक्षक किंवा इतर कोणाचा प्रभाव संघ निवडीवर असायला नको. सध्या तरी शुभमन गिलनुसार भारताचा अंतिम संघ निवडला जात नसावा.