Arjun Tendulkar vs Shubman Gill Vijay Hazare Trophy match
esakal
Arjun Tendulkar one run Shubman Gill failure in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पंजाब विरुद्ध गोवा या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारताच्या कसोटी व वन डे संघाचा कर्णधार शुभमन गिल या सामन्यातून मैदानावर पुनरागमन करणार होता. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी त्याची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची आहे. त्याचवेळी गोवा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुन तेंडुलकर विरुद्ध शुभमन गिल यांच्यातल्या ठसनची सर्वांना प्रतीक्षा होती. पण, दोघंही आपापल्या संघाकडून अपयशी ठरले आणि चाहत्यांचा हिरमोड झाला.