
ICC Women's U19 T20 World Cup : भारताच्या चार खेळाडूंनी आयसीसीच्या १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात स्थान पटकावले आहे. त्यांच्यासह उप विजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंची या संघात निवड झाली आहे. भारताची आघाडीची फलंदाज अन् अष्टपैलू कामगिरी करून स्पर्धा गाजवणारी गोंगाडी त्रिशा हिच्यासह जी कमालिनी या फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची जेम्मा बोथा, इंग्लंडची डॅव्हिना पेरीन आणि ऑस्ट्रेलियाच्या काओम्हे ब्रेय या १०० हून अधिक धावा करणारींचाही समावेश केला गेला आहे.