Gurnoor Brar reveals India's team culture and success mantra
सुनंदन लेले
भारतीय संघात खेळाडूचे मूल्यमापन यश-अपयशावरून होत नाही, ते मेहनतीवरून केले जाते. यश-अपयश खेळाडूंच्या हाती नसते. सातत्यपूर्ण मेहनत आणि सुधारणेचा ध्यास असणे हे मात्र हाती असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने व्यक्त केले. भारतीय संघाकडून सुरुवातीला खेळताना गुरनूर ब्रारला लॉर्ड्स मैदानावरील सामन्यात चांगलाच धावांचा मार पडला होता. ही आठवण काढताना ब्रार म्हणाला, अपेक्षेप्रमाणे चांगला मारा न करता आल्यामुळे मी जास्त धावा दिल्या, पण मी त्या सामन्यातून मी खचलो नाही, तर बरेच काही शिकलो.