India Cricket TeamX/BCCI
Cricket
इंग्लंड-श्रीलंकेचे खेळाडू ३ भारतीय खेळाडूंवर वरचढ ठरले! जिंकला ICC चा मानाचा पुरस्कार
ICC Player of the Month: आयसीसीने जुलै २०२४ महिन्यातील 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.
July 2024 Player of The Month Award: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूला पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार आता जुलै २०२४ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंचीही घोषणा झाली आहे.
या महिन्यात सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून इंग्लंडच्या गस ऍटकिन्सन या खेळाडूला निवडण्यात आले आहे, तर सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूला निवडले आहे.
आयसीसीने जुलै २०२४ मधील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी भारताच्या वॉशिंग्टन सुंदरसह इंग्लंडच्या गस ऍटकिन्सन आणि स्कॉटलंडच्या चार्ली कॅसल यांना नामांकन दिलं होतं.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)