क्रिकेटच्या टी२० सामन्यात फलंदाज पाय वर करताच त्रिफळाचीत होण्याची दुर्मिळ घटना घडली. इब्रार अहमदच्या चेंडूवर हमिद खानने पाय वर केला आणि चेंडू स्टंपवर आदळला. गल्फ जायंट्सने ५ विकेट्सने विजय मिळवला.क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातही एखादा फलंदाज जेव्हा त्रिफळाचीत होतो, तेव्हा गोलंदाजाला तर भलताच आनंद होतो. कारण जेव्हा फलंदाज त्रिफळाचीत होतो, तेव्हा बऱ्याचवेळा फलंदाजाला तो चेंडू समलेलाच नसतो किंवा खेळता आलेला नसतो. मात्र फलंदाजाने पाय वर केला आणि त्रिफळाचीत झाला, अशी घटना फारच दुर्मिळ आहे. पण असं नुकतेच एका टी२० सामन्यात घडले आहे..Viral Video: वाईड बॉलवर आधी स्वीच हिट अन् मग हिट विकेट; T20 मॅचमध्ये फलंदाज विचित्रपद्धतीने बाद.सध्या ILT20 Development ही स्पर्धा युएईमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी (१ सप्टेंबर) अबुधाबी नाईट रायडर्स विरुद्ध गल्फ जायंट डेव्हलपमेंट संघात झाला. या सामन्यात अबुधाबीने १५६ धावांचे लक्ष्य गल्फ जायंट्ससमोर ठेवले होते. यावेळी गल्फ जायंट्सने ५ विकेट्स गमावत १६.३ षटकात १५६ धावा करत हा सामना ५ विकेट्सने जिंकला..पण या सामन्यात गल्फला हमिद खानने सलामीला खेळताना आक्रमक सुरूवात दिली होती. त्याने १० चेंडूतच २३ धावा केल्या होत्या. तो त्याचा ११ वा चेंडू इब्रार अहमद दावरविरुद्ध खेळला. मात्र इब्राब अहमदने टाकलेल्या चेंडूवर बचावात्मक खेळताना तो मागे सरकला पाय वर केला की जेणेकरून चेंडू सोडता येईल. मात्र, त्याला चेंडू समजला नाही आणि त्याच्या दोन पायांच्या मधून जात चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे हमीदला त्रिफळातचीत होत माघारी परतावे लागले..मात्र नंतर कर्णधार जोनाथन फिगीने आक्रमक खेळत नाबाद ७१ धावा केल्या आहेत. त्याने ४१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार मारले. त्यामुळे गल्फ जायंट्स संघाला विजय मिळवण्यात यश आले. अबुधाबीकडून गोलंदाजी करताना रोनक पनोलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर इब्रार अहमद आणि एस कल्याण यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली..6,6,6,6,6,6,6... पोलार्डचं वादळ! ८ चेंडूत ठोकले तब्बल ७ षटकार, Video Viral.तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना अबुधाबीकडून एम शहादादने सर्वाधिक ३५ धावा केल्या. अली अबीदने ३१ धावांची खेळी केली. अहमद तारीकने २९ धावा आणि सईद हैदरने २८ धावा केल्या. त्यामुळे अबुधाबीने २० षटकात ७ बाद १५५ धावा केल्या होत्या. गल्फ जायंट्सकडून झहिद अली आणि उझेर खान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या..FAQs१. क्रिकेटमध्ये त्रिफळाचीत म्हणजे काय?त्रिफळाचीत म्हणजे चेंडू थेट स्टंपवर लागून फलंदाज बाद होणे.(What is bowled out in cricket?)२. हमिद खान कसा बाद झाला?त्याने पाय वर केला आणि चेंडू त्याच्या पायाखालून जात स्टंपवर लागला.(How did Hamid Khan get dismissed?)३. या सामन्यात कोणत्या संघाने विजय मिळवला?गल्फ जायंट्सने अबुधाबीवर ५ विकेट्सने विजय मिळवला.(Which team won the match?).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.