
क्रिकेट आता जवळपास बाराही महिने खेळले जाते. त्यातही भारतात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, त्यामुळे सहाजिकच भारतात क्रिकेटचे मार्केटही मोठे आहे. त्यामुळे सध्या भारतातील विविध भाषांमध्येही सामन्यांचे समालोचन होत असते.
सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १८ वा हंगाम (IPL 2025) सुरू आहे. या स्पर्धेसाठीही मराठी, हिंदी, इंग्लिंश, तमिळ, तेलुगु, कन्नडा, बंगाली, पंजाबी, भोजपूरी, हरियानवी, मल्याळम, गुजराती अशा विविध भाषांमध्ये समालोचन होत आहे.