Harbhajan Singh: कसोटी क्रिकेटला श्रद्धांजली! ईडन गार्डनच्या खेळपट्टीवरून हरभजनसिंगची तीव्र भावना
Harbhajan Singh Slams Eden Gardens Pitch After India’s Defeat: कसोटी क्रिकेट, ईडन गार्डन पिच, हरभजनसिंग ईडन गार्डनवरील सुमार खेळपट्टीवर हरभजनसिंगने कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त करणाऱ्या निर्णयांवर घणाघात केला. भारत–दक्षिण आफ्रिका सामन्यातील पराभवानंतर खेळपट्टीची तीव्र टीका वाढली आहे.
नवी दिल्ली : त्यांनी कसोटी क्रिकेट पूर्णपणे उद्ध्वस्थ केले... कसोटी क्रिकेटला श्रद्धांजली, अशा तीव्र शब्दात भारताचा माजी कसोटीपटू हरभजनसिंगने ईडन गार्डनवरील खेळपट्टी तयार करणाऱ्यांवर आसूड ओढले.