

Gautam Gambhir on Hardik Pandya fitness
esakal
Gautam Gambhir on Hardik Pandya fitness: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात हार्दिक पांड्याची निवड झाली नाही. २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर हार्दिक दुखापतीमुळे संघाबाहेरच आहे. विंडीजविरुद्ध तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती, परंतु त्याला पुन्हा एकदा तंदुरुस्तीच्या कारणामुळे संघाबाहेर बसावे लागले. त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी मिळाली आहे आणि त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आता हार्दिकच्या पुनरागमनावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मोठं विधान केलं आहे.