Hardik Pandya Mumbai Indians exit rumours IPL 2027
esakal
Mumbai Indians IPL 2027 trade rumours explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी बऱ्याच संघात बरेच बदल पाहायला मिळतील, परंतु सर्वांना उत्सुकता आहे ती, हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) निर्णयाची. हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी फायद्याचा ठरलेला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे आणि दोघांमध्ये मतभेद झाल्याचेही सांगितले जातेय. अशात हार्दिक गेला, तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) सोपवली जाईल, अशीही चर्चा रंगली आहे. पण, त्यावरून संघ व्यवस्थापनात दोन गट पडल्याचे वृत्त समोर येत आहे.