Hardik Pandya smashed his maiden List A century in just 68 balls in the Vijay Hazare Trophy
esakal
Hardik Pandya maiden List A century Vijay Hazare Trophy: दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० मालिका गाजवल्यानंतर हार्दिक पांड्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसला. राजकोट येथे सुरू असलेल्या लढतीत विदर्भ संघाविरुद्ध हार्दिकने वादळी शतक झळकावले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ११ वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या हार्दिकचे हे पहिले शतक ठरले. त्याने ६८ चेंडूंत तिहेरी आकडा गाठताना बडोदा संघाला ५ बाद ७१ धावांवरून दोनशेपार पोहोचवले. हार्दिक न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे यावरून स्पष्ट होते.