Mumbai Indians Playing XI IPL 2027 : अर्शदीप सिंग- जसप्रीत बुमराह... दो भाई, दोनो तबाही; रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील MI ची तगडी प्लेइंग इलेव्हन बघाच...

Mumbai Indians best playing XI after Arshdeep Singh trade: आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा धक्का देत आपल्या संघात महत्त्वाचा बदल केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार असून, त्याच्या बदल्यात मुंबईने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
Mumbai Indians best playing XI after Arshdeep Singh trade

Mumbai Indians best playing XI after Arshdeep Singh trade

esakal

Updated on: 

Arshdeep Singh and Jasprit Bumrah bowling combination in IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वीची सर्वात मोठी ट्रेड बुधवारी झाली... मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या IPL 2027 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. त्याच्यासाठी PBKS ने अर्शदीप सिंगला ट्रेड केले आणि १८ कोटींच्या बोलीत या दोघांची अदलाबदली झाली. हार्दिकच्या एक्सिटमुळे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा ( Rohit Sharma Captain) करणार, हेही निश्चित झाले आहे. अर्शदीपच्या येण्याने MI ची प्लेइंग इलेव्हन आणखी तगडी झाली आहे, कारण हार्दिकला सक्षम पर्याय त्यांनी आधीच तयार करून ठेवला आहे.

Loading content, please wait...