

Hardik Pandya
sakal
Suryakumar Yadav, Hardik Pandya future in Mumbai Indians uncertain : इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या पूर्वतयारीला सर्व फ्रँचायझींनी सुरूवात केली आहे. IPL 2027 पूर्वी खुल्या असलेल्या 'ट्रेड विंडो' द्वारे बऱ्याच मोठ्या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची सुरूवात रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) ट्रेडने झाली आहेच... २७ कोटींचा रिषभ लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडून १५ कोटींत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. अशातच मुंबई इंडियन्सरच्या ताफ्यातूनही महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याला ट्रेड केले जाणार आहे.