Hardik Pandya : 'मी इंजेक्शनवर इंजेक्शन घेतले, पण...' वर्ल्ड कपमधील दुखापतीवर हार्दिक पांड्याचा मोठा खुलासा

Hardik Pandya on World Cup 2023 Injury : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतून बाहेर पडला होता. परंतु आयपीएल स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्याने वर्ल्ड कप 2023 च्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Hardik Pandya on World Cup 2023 Injury Latest News Marathi
Hardik Pandya on World Cup 2023 Injury Latest News Marathisakal

Hardik Pandya on World Cup 2023 Injury : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतून बाहेर पडला होता. तो बाहेर गेल्यामुळे भारतीय संघात प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली.

घोट्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या तब्बल 4 महिने क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर होता. आता तो आयपीएल 2024 च्या हंगामात शानदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2024 साठी संघाचा कर्णधार बनवला आहे, परंतु आयपीएल स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्याने वर्ल्ड कप 2023 च्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे.

Hardik Pandya on World Cup 2023 Injury Latest News Marathi
Mohammad Kaif : वर्ल्ड कप 2023 मधील पराभवासाठी रोहित-द्रविडला जबाबदार; टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू स्पष्टच बोलला

खरंतर, हार्दिक पांड्या स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'मी अशा क्रिकेटर्सपैकी नाही की जे 2-3 महिने आधी तयारी करतात. या वर्ल्ड कपसाठी मी वर्षभर आधीच तयारी सुरू केली होती. मी माझा दिनक्रम आखला होता आणि त्यानुसार सराव करत होतो. ही दुखापत अचानक झाली.

Hardik Pandya on World Cup 2023 Injury Latest News Marathi
R Ashwin: 'त्यांनी विचारलं त्याला CSK संघात घेणार नाही का?', अश्विनने ऐकवला पहिल्या IPL चा किस्सा

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, वर्ल्ड कपदरम्यान मी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला सांगितले होते की, मी 5 दिवसांनी परत येईन. नंतर मी माझ्या घोट्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी इंजेक्शनवर इंजेक्शन घेतले, आणि त्यावेळी घोट्याला सूज आल्याने त्यातून रक्त बाहेर काढावे लागले.

शेवटी तो म्हणाला की, पण मला हार मानायची नव्हती आणि संघासाठी माझे सर्वोत्तम द्यायचे होते. मला वाटले की संघासोबत राहण्याची एक टक्काही संधी असेल तर मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी स्वतःला ढकलत राहिलो, पण माझी दुखापत पुन्हा वाढली आणि तीन महिन्यांची दुखापत झाली. कारण मी खूप प्रयत्न करत होतो की मला चालताही येत नव्हते, तरीही मी धावण्याचा प्रयत्न करत होतो.

Hardik Pandya on World Cup 2023 Injury Latest News Marathi
मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 मधील सुरुवातीच्या सामन्यांना 'हा' वेगवान गोलंदाज मुकणार

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप 2023 च्या चौथ्या साखळी सामन्यात फलंदाजी करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्याला दुखापतीचा सामना करावा लागला. मोजकेच सामने गमावल्यानंतर तो पुनरागमन करेल असे बोलले जात होते, पण ते शक्य झाले नाही.

खुद्द हार्दिक पांड्या सुद्धा 10 दिवसात बरा होईल असा विचार करत होता पण ते शक्य झाले नाही. हार्दिक पांड्यामुळे टीम कॉम्बिनेशनवर परिणाम झाला, पण मोहम्मद शमी प्लेईंग इलेव्हनमध्ये परतताच त्याने हार्दिकची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. शमीने सातत्याने विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com