

Hardik Pandya likely to New Captain : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आणि कर्णधारपदाची माळ उप कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याच्या गळ्यात जाईल असे वाटले होते. पण, रोहित व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्या हट्टाखातर ही जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर सोपवली गेली. यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व बीसीसीआयमधील काही सदस्य यांच्या मनात हार्दिकवर अन्याय झाला ही भावना निर्माण झाली. पण, गौतम सहजासहजी काही विसरत नाही आणि तो त्याच्या 'लाडक्या'ला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर बसवण्याच्या तयारीला लागला आहे.