Hardik Pandya trade news latest update 2026
esakal
Hardik Pandya to Kolkata Knight Riders IPL 2027? इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) नेतृत्व रोहित शर्मा करणार हे निश्चित झालं आहे. त्याची औपचारिक घोषणा तेवढी शिल्लक आहे. अशात हार्दिक पांड्या, आता काय करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी CSK, KKR सह सहा संघ शर्यतीत असल्याची चर्चा रंगलीय. पण, त्यात हार्दिकचे कर्णधारपदाचे स्वप्न कोलकाता नाइट रायडर्सच पूर्ण करू शकते आणि म्हणून हा अष्टपैलू खेळाडू कोलकाता फ्रँचायझीकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, हार्दिकच्या मोबदल्यात मुंबई इंडियन्सने KKR कडे दोन स्टार खेळाडू मागितले आहेत आणि त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.