Mumbai Indians Hardik Pandya replacement latest news
esakal
R Ashwin Names 4 Big Players Who Could Join Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) ट्रेड करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स, या दोन फ्रँचायझींपलीकडे विचार करायला हवा, असे मत माजी क्रिकेटपटू आर अश्विनने व्यक्त केले आहे. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर हार्दिक अन् MI सामंजस्याने करार मोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सध्या CSK आणि KKR या दोन फ्रँचायझी आघाडीवर आहेत. पण, या ऑल राऊंडरला ट्रेड करण्यासाठी मुंबईने सनरायझर्स हैदराबाद ( SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स ( DC) सारख्या संघांचाही विचार करायला हवा, असे अश्विनला वाटते.