Hardik Pandya to KKR with captaincy offer
esakal
Hardik Pandya Could Get ₹25 Crore and Captaincy : कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्ससोबतची डिल फिसकटल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या ऑल राऊंडरला नवीन ऑफर मिळाली आहे. Mumbai Indians सोबत कर्णधार म्हणून मागील तीन पर्वात हार्दिकला काही खास चमक दाखवता आली नाही. त्यामुळे MI त्याला इंडियन प्रीमिअर लीग २०२७च्या पूर्वी बाजूला करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशात हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यास चेन्नई सुपर किंग्ससह आणखी काही फ्रँचायझींची नावं चर्चेत होती. पण, ताज्या अपडेट्सनुसार CSK आणि हार्दिक यांच्यातली डिल कर्णधारपदावरून फिसकटली आहे.