Hardik Pandya 75 runs off 31 balls VHT match
esakal
Vijay Hazare Trophy 2025 Hardik Pandya performance: विदर्भ संघाविरुद्धच्या वादळी शतकानंतर हार्दिक पांड्याने विजय हजारे ट्रॉफीत दुसऱ्या सामन्यात आज चंदिगढच्या गोलंदाजांची धुलाई केली. बडोदा संघाने सलामीवीर नित्या पांड्या ( २) व ए पासी ( ५) हे अपयशी ठरल्यानंतर प्रियांशू मोलिया व विष्णू सोलंकी यांनी डाव सावरला होता. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर हार्दिकने वादळी खेळ करताना १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. VHT च्या दोन सामन्यांत त्याे २० षटकार व ११ चौकार खेचले आहेत.