

Harmanpreet Kaur Statement
esakal
HARMANPREET KAUR BIG STATEMENT AFTER INDIA BEAT PAKISTAN: शनिवारी झालेल्या महिला आशिया कपमध्ये, पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानच्या चारही मुंड्या चित केल्या आणि सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. हा सामना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी(Harmanpreet Kaur) महत्त्वाचा ठरला.
तिने कर्णधार म्हणून १५०वा ट्वेंटी-२० सामना खेळणारी जगातील पहिली महिला ठरली. भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना ७ विकेट्सने आपल्या नावावर केल्यानंतर हरमनप्रीत कौरने याबद्दल वक्तव्य केले आहे.