

IND vs SL Final
esakal
IND vs SL Final: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
अंतिम सामन्यात कोणताही वेगळा प्रयोग करण्यापेक्षा आपल्या ताकदीवर विश्वास ठेवून खेळा, असं हरमनप्रीतने संघातील खेळाडूंना सांगितलं आहे. मागील वेळी श्रीलंकेने भारताला अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यामुळे यावेळी भारताचं लक्ष्य त्या पराभवाचा बदला घेत आशिया कप जिंकण्यावर असणार आहे.