

Fans Compare Harmanpreet Kaur Reaction to MS Dhoni Viral Video
esakal
Fans Compare Harmanpreet Kaur Reaction to MS Dhoni Viral Video: आयसीसी(ICC) महिला टी-२० विश्वचषकाची सुरुवात १२ जूनपासून होणार आहे. त्याआधी झालेल्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एमएस धोनीच्या(MS DHONI) आठवणींना उजाळा देणारा एक क्षण निर्माण केला.
हरमनप्रीत कौर(Harmanpreet Kaur) ही तिच्या दहाव्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, त्याआधी अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही तिची शेवटची स्पर्धा असू शकते, अशी चर्चा सध्या रंगत आहे. भारतीय महिला संघ १२ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे.