भारत-इंग्लंड यांच्यात उद्यापासून चौथी कसोटी सुरू होणार आहे
मँचेस्टर कसोटीपूर्वी इंग्लंडच्या फलंदाजाकडून माईंडगेम सुरू झाला आहे
इंग्लंडकडे मालिकेत २-१ अशी आघाडी आहे आणि भारताकडून पुनरागमन अपेक्षित आहे
Harry Brook’s comment before India vs England 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यातली चौथी कसोटी उद्यापासून म्हणजेच २३ जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे आणि चौथी कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळेच सामन्यापूर्वी त्यांच्याकडून भारतीयांना डिवचण्याचा खेळ सुरू झाला आहे. भारतीय संघ आधीच दुखापतग्रस्त खेळाडूंच्या वाढत्या संख्येने चिंतित आहे आणि त्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मुद्दाम मोठं विधान केलं आहे.