ICC Women's World Cup Qualifier स्पर्धेत काल वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात कट्टर मॅच पाहायला मिळाली. स्कॉटलडच्या महिला संघाने ११ सामन्याने ही मॅच जिंकली असली तरी चर्चा मात्र हेली मॅथ्यूजची ( Hayley Matthews ) राहिली. दुखापतीमुळे मॅथ्यूजला चालणेही अवघड झाले होते आणि तिला स्ट्रेचरवरून माघारी परतावे लागले. २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २०३ धावांवर वेस्ट इंडिजची नववी विकेट पडली आणि बरोबर एक चेंडू आधीच मॅथ्यूजने मैदान सोडले होते. संघ अडचणीत सापडलाय हे पाहून तिने पुन्हा मैदानावर येऊन खेळण्याचा निर्णय घेतला.