Cricket Funny Video : दोन्ही फलंदाज एकाच एंडला, चेंडू खेळाडूच्या हातात, हातभर अंतरावर स्टम्प... ३ वेळा संधी तरीही विकेट नाहीच

Cricket funny moment when both batsmen were at one end: क्रिकेटमध्ये अनेकदा मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. कधी खेळाडू सोपा झेल टाकतो, कधी रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली जाते, तर क्षेत्ररक्षण करताना खेळाडूची पँट घसरतेही.
Cricket Funny Video
Cricket Funny Video esakal
Updated on

Funny cricket video where both batsmen end up at the same crease: शालेय क्रिकेटमधील एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. दोन्ही फलंदाज एका एंडला असूनही क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना एकालाही बाद करता न आल्याचा हास्यास्पद व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये फलंदाजाने चेंडूला फटका मारून एक धाव घेण्यासाठी पळ काढला होता. सुरुवातीला नॉन स्ट्रायक एंडवरील फलंदाजही पळाला. पण, दोन पावलं पुढे जाऊन तो माघारी परतला, कारण तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचला होता. आता दोन्ही फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला होते. मग पुढे जे घडले ते मजेशीर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com